नगरमध्ये अग्निशमन बंबाव्दारे औषध फवारणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:57 PM2020-03-25T13:57:19+5:302020-03-25T13:58:03+5:30

कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने बुधवारपासून अग्निमशमन बंबाव्दारे सोडियम हायप्रो क्लोराईडची फवारणी सुरू केली आहे.  फवारणीचे काम सुरू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Spraying the drug with fire bombs in the city | नगरमध्ये अग्निशमन बंबाव्दारे औषध फवारणी 

नगरमध्ये अग्निशमन बंबाव्दारे औषध फवारणी 

अहमदनगर : कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने बुधवारपासून अग्निमशमन बंबाव्दारे सोडियम हायप्रो क्लोराईडची फवारणी सुरू केली आहे.  फवारणीचे काम सुरू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोराना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई व पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. अहमदनगर महापालिकेनेही बुधवारी मध्यवर्ती शहरातून जंतूनाशक फवारणीचे काम होती घेतली आहे. आरोग्य विभागाने ६०० लिटर सोडीएम क्लोराईड विकत घेतले आहे. जुने महापालिका कार्यालय येथून सुरू झालेली ही मोहीम गाडगीळ पंटांगण, दिल्लीगेट, चितळे रोडमार्गे कापडबाजारात पोहोचली आहे. कापड बाजारानंतर उपनगरातील सार्वजनिक ठिकाणी ही फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Spraying the drug with fire bombs in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.