सोळाशे गावातील शेतक-यांना मिळणार फवारणी संरक्षण किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 07:16 PM2017-10-12T19:16:22+5:302017-10-12T19:16:37+5:30
यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यात जनजागृती मोहीम राबविण्यास येत आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ६०० गावांमध्ये १ नोव्हेबरनंतर १६ हजार संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी औषधविक्रीच्या १७ कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
अहमदनगर : यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यात जनजागृती मोहीम राबविण्यास येत आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ६०० गावांमध्ये १ नोव्हेबरनंतर १६ हजार संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी औषधविक्रीच्या १७ कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
औषध फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मनुष्यहानीमुळे अहमदनगर जिल्ह्यातही सतर्कतेचे उपाय करण्यात येत आहेत. औषधांची फवारणी करताना शेतकºयांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. फवारणी संरक्षक किट वापरण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. जनजागृतीबरोबच जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांत फवारणी किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये चष्मा, मास्क, हातमोजे व अॅप्रोनचा समावेश आहे. या किटसाठी १७ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेअंर्तगत प्रत्येक गावात दहा संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. सोळाशे गावांत तब्बल सोळा हजार किटचे वितरण होणार आहे. बाजारात या किटची किंमत २५० ते ३५० रुपये आहे. या वाटपामध्ये फवारणी करणाºया मजुरांना प्राधान्य दिले जाणार आहे. औषध फवारणीच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाचे प्रशासन तालुका कृषी अधिकाºयांसह कृषी सहायकांच्या कार्यशाळा घेत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांनी शेतकºयांमध्ये कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके फवारणीबाबत जागरूकता निर्माण करावयाची आहे. अहमदनगर जिल्ह्याबरोबच ही मोहीम पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.
- शेतक-यांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून व्यापक अशी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. फवारणीनंतर उलटी होणे, मळमळ होणे असा त्रास झाल्यास कीटकनाशक, तणनाशकांच्या रिकाम्या डब्यासह डॉक्टरांशी संपर्क करावा. प्रबोधनासाठी फवारणी किटचे वाटप करण्यात येणार आहे.
- - पंडित लोणारे, जिल्हा कृषी अधिकारी