श्रीगोंदा : म्हसेत बिबट्याच्या टोळीचा हल्ला, 17 शेळ्या-मेंढ्या ठार, 13 गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:16 AM2019-06-23T11:16:10+5:302019-06-23T17:32:56+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथील मेंढपाळ नंदकुमार गोरे यांच्या शेळ्या - मेंढ्याच्या कळपावर बिबट्याच्या टोळीने हल्ला केला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथील मेंढपाळ नंदकुमार गोरे यांच्या शेळ्या - मेंढ्याच्या कळपावर बिबट्याच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात 17 शेळ्या-मेंढ्या ठार झाल्या. 2 कोकरी जखमी अवस्थेत सापडली आहेत तर 13 शेळ्या- मेंढ्या गायब झाल्या आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
नंदकुमार गोरे यांचा 60 शेळ्या मेंढ्यांचा कळप आहे. शनिवारी रात्री पाऊस आला म्हणून ते घरी झोपण्यास गेले. तेवढ्यात बिबट्याची टोळी शेळ्या-मेढ्यांच्या कळपात घुसली. धुमाकूळ घालत 13 शेळ्या-मेंढ्यांचा फडशा पाडला तर दोन कोकरी जखमी केली . तर काही शेळ्या मेंढ्या गायबच करून टाकल्या.नंदकुमार गोरे हे सकाळी कळपाकडे गेले असता त्यांनी हे दृश्य पाहिले. त्यांना रडूच कोसळले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतले त्या ठिकाणी बिबट्याचे पदमार्क आढळून आले आहेत. पण हा हल्ला बिबटे, लांडगे, तरस अथवा शिकारी कुत्र्यांच्या टोळीने केला याबाबत साशंकता आहे.