सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले साईदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:03 PM2018-08-22T12:03:38+5:302018-08-22T12:03:43+5:30
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली.
शिर्डी : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली.
शिर्डीमध्ये साई समाधी शताब्दी निमित्त गंगागिरी सप्ताहाला भेट देण्यासाठी काल सायंकाळी भागवत शिर्डीत दाखल झाले. आज सप्ताह स्थळी भेट देणार असून तेथील व्यवस्थेची पाहणी करून प्रवचनाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर चार वाजता स्वयंसेवकाशी संवाद साधणार आहेत. यावेळी तालुका संघचालक रावसाहेब गोंदकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रांत संघ चालक नानाजी जाधव, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, राजेंद्र गोंदकर उपस्थित होते.