श्रीगोंदा तालुक्यात घोडचा डावा कालवा फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:54 AM2019-02-06T11:54:04+5:302019-02-06T11:56:18+5:30
घोडचे आवर्तन चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील इनामगाव शिवारातील घोड नदीवरील गांधले मळा बंधा-यात पाणी नेण्यासाठी मंगळवारी रात्री घोडचा डावा कालवा वांगदरी हद्दीत फोडला आहे.
काष्टी : घोडचे आवर्तन चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील इनामगाव शिवारातील घोड नदीवरील गांधले मळा बंधा-यात पाणी नेण्यासाठी मंगळवारी रात्री घोडचा डावा कालवा वांगदरी हद्दीत फोडला आहे. त्यामुळे घोडचे आवर्तन बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
घोडचे आवर्तन चालू असताना घोडचा डावा कालवा मंगळवारी रात्री वांगदरी चिंभळे हद्दीत अज्ञात व्यक्तीने फोडला.त्यामुळे घोड धरणातून पाणी कमी करण्यात येणार आहे. मात्र कालवा कोणी फोडला याचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे घोडचे उपाभिंयता प्रकाश लंकेश्वर यांनी सांगितले. घोडचे आवर्तन कालवा दुरुस्त करून आवर्तन सुरु ठेवायचे कि बंद करायचे यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.