युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:37 PM2019-01-04T19:37:11+5:302019-01-04T19:39:47+5:30
बर्फ सुरू होताच भारतात आगमन : भारतात भोरड्या, गुलाबी मैना नावाने परिचित
- शिवाजी पवार
श्रीरामपूर : ‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके, !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.
डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्यातील दोन महिने त्यांचा येथे सहवास असतो. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतींवर एकत्र जमून सूर्यास्तानंतर ते आकाशात कवायती सादर करतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होते. अवघा दहा मिनिटे होणारा आकाशातील त्यांचा अदभूत थरार अचंबित व तितकाच आकर्षित करणारा ठरतो. विशेष म्हणजे वडाच्या एका झाडावर रात्री त्यांचा मुक्काम ठरलेला आहे.
शेतातील पिकांचे अवशेष, किडे हा त्यांचा आहार. शेतकरी व अन्य नागरिकांना कसलेही आर्थिक वा मानसिक नुकसान पोहोचू न देता ते या ठिकाणी आपले नाते व मैत्री जोडतात. हे नाते प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होते आहे. जारो मैैलाच्या आपल्या प्रवासादरम्यान शांतता, सहजीवन यांचाच जणू ते संदेश देणारे दूत ठरले आहेत.
दहा वर्षे सातत्याने येतात
युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.