जामखेड-खर्डा रस्त्यावर एसटी बस व चारचाकी वाहनाचा अपघात; दोन ठार, तीन जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:26 AM2024-06-10T11:26:15+5:302024-06-10T11:26:26+5:30

अपघातातील जखमीवर उपचार सुरू असताना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू झाला. 

ST bus and four wheeler accident on Jamkhed-Kharda road; Two killed, three injured  | जामखेड-खर्डा रस्त्यावर एसटी बस व चारचाकी वाहनाचा अपघात; दोन ठार, तीन जखमी 

जामखेड-खर्डा रस्त्यावर एसटी बस व चारचाकी वाहनाचा अपघात; दोन ठार, तीन जखमी 

- अशोक निमोणकर

जामखेड (जि.अहमदनगर):  जामखेड -खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात एसटी बस व चारचाकी वाहनाचा समोरासमोर रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातातील जखमीवर उपचार सुरू असताना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू झाला. 

अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना जामखेड येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पोलिसांनी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले होते. उपचार घेत असताना त्यातील दोन जण मृत्यु पावले आहेत. तीन जणांवर उपचार चालू आहेत.

जामखेड खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात कोपरगाव आगाराची शिर्डी- हैदराबाद बस शिर्डी येथे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास एस.टी. (क्रमांक M H ०९ FL १०२७ ) व वडगाव गुप्ता अहमदनगर येथील चारचाकी वाहन क्रमांक (एम एच १६ ए टि ६४९२) या दोन वाहनाची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. 

याबाबत ११२ क्रमांकावरून जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना फोन झाला असता त्यांनी तातडीने पेट्रोलिंग वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस कॉन्स्टेबल देवीदास पळसे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भोरे वाहनचालक अडसुळ व १०८ क्रमांक व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपले अँम्ब्यलन्स घेऊन पाठवले. 

जखमी झालेल्यांची नावे मयुर संतोष कोळी (वय १८ ), सचिन गिते (वय २८), अमोल डोंगरे (वय ३०, सर्वजण वडगाव गुप्ता रा. अहमदनगर) आहेत. तर विजय गंगाधर गव्हाणे (२४), पंकज सुरेश तांबे (रा.वडगाव गुप्ता अहमदनगर) यांच्या मृत्यू झाला आहे.

Web Title: ST bus and four wheeler accident on Jamkhed-Kharda road; Two killed, three injured 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात