कोरोना रुग्णालय सुरू करा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:21 AM2021-04-09T04:21:07+5:302021-04-09T04:21:07+5:30
माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, संकेत संचेती, सुशिला करपे यांनी ...
माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, संकेत संचेती, सुशिला करपे यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा स्फोट झाला आहे. मात्र नागरिकांसाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पालिका जर गांभीर्याने पाहत नसेल तर त्यांचे डोळे उघडण्यासाठी मुरकुटे हे स्वत: घेरावो व साखळी उपोषणात सहभागी होतील असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामीण भागासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर उपचार केले जात आहेत. शहरातील नागरिक मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. मुरकुटे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्नेहल खोरे यांनीही पालिकेला कोरोना विरूद्ध लढाईचा विसर पडल्याचा आरोप केला आहे. पालिकेकडून अडचणीच्या काळात करवसुली सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र त्याबदल्यात कोणत्याही सुविधा प्रदान केल्या जात नाहीत, असे खोरे यांनी म्हटले आहे.
---------