केडगावला कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:43+5:302021-04-06T04:19:43+5:30
आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे, नगर शहरामध्ये गेल्या ८ दिवसांपासून कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण ...
आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे, नगर शहरामध्ये गेल्या ८ दिवसांपासून कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय रुग्णालय, मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे उपचारासाठी रुग्ण व नातेवाइकांची धावपळ होत आहे. यासाठी महापालिकेने रुग्णांना चांगली आरोग्य देण्याचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये ताबडतोब कोविड कक्ष सुरू करून रुग्णांना व नातेवाइकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करून सर्व आरोग्य सुविधांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजीसभापती तथा नगरसेवक मनोज कोतकर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.