रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:17 PM2019-06-25T13:17:34+5:302019-06-25T13:20:59+5:30

महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले.

Start the school of Railway Station: Front for the parents - students' rally in the school | रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा

रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा

अहमदनगर : महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंगळवारी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत येऊन गोंधळ घातला.
दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिकेच्या रेल्वे स्टेशन येथील शाळेत माध्यमिक विभाग सुरू केला. तत्कालीन सभापतींच्या मान्यतेचे या शाळेत शिक्षक, मुध्याध्यापक, शिपाई ही पदे भरण्यात आली. तिन्ही वर्ग सुरू झाले. रेल्वे स्टेशन परिसरातील मागासवर्गीय, गोर-गरीब विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळाला. मात्र सदरचा माध्यमिक विभाग बेकायदेशीर असल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तेथील शिक्षकांनी अनेकवेळा प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर महापालिकेच्या सभेत मंगळवारी थेट पालकांनीच गोंधळ घालून शाळा सुरू करण्याची मागणी केली. पालक, महिला थेट सभेत घुसल्या आणि त्यांनी चक्क ठिय्या दिला. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली.
दहावी उत्तीर्ण झालेल्या १६ विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले आणि दहावीची गुणपत्रिका देण्यासही प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे आपले गुण आपल्या डोळ््या पाहण्यास विद्यार्थी मुकले. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासही अडथळे आले आहेत. यामुळेही पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.
बेकायदेशीर असलेल्या शाळेच्या शिक्षक, शिपाई यांना आतापर्यंत मानधन दिले जात होते. तेही मानधन प्रशासनाने रोखल्याने त्यांच्यावरही नोकरीची टांगती तलवार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अन्य शाळात समायोजन करा, अशी मागणी पालकांची आहे.

Web Title: Start the school of Railway Station: Front for the parents - students' rally in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.