आंबिजळगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:17+5:302021-05-16T04:20:17+5:30
कर्जत : तालुक्यातील आंबिजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, तालुका ...
कर्जत : तालुक्यातील आंबिजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
आंबिजळगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे. याप्रश्नी ग्रामस्थ व पदाधिकारी यांची बैठक झाली. येथील लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. येथे आरोग्य विभागाची इमारत आहे. शिवाय हे कोरेगाव, अळसुंदे, सटवायवाडी, बजरंगवाडी, खातगाव, शेगुड, माळंगी, डोंबाळवाडी, निंबे, देमनवाडी अशा अकरा गावांतील नागरिकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. या भागातील लोकांना सध्या राशीन किंवा चापडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जावे लागत आहे. राशीन किंवा चापडगाव ही दोन्ही ठिकाणे या भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी दूर आहेत. तेथे गेल्यावरही लस मिळत नाही. त्यामुळे अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. आंबिजळगाव येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू केले, तर ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. शिवाय पायपीट करावी लागणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
---
१५ आंबिजळगाव
आंबिजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत.