शिर्डीत लसीकरण केंद्र सुरू करा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:21 IST2021-05-11T04:21:36+5:302021-05-11T04:21:36+5:30
शासनाने सध्या केवळ शासकीय सेंटरवरच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शिर्डीतील संस्थानच्या लसीकरण केंद्राला खासगी केंद्राच्या यादीत ...

शिर्डीत लसीकरण केंद्र सुरू करा, अन्यथा उपोषण
शासनाने सध्या केवळ शासकीय सेंटरवरच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शिर्डीतील संस्थानच्या लसीकरण केंद्राला खासगी केंद्राच्या यादीत टाकल्याने शिर्डीतील केंद्राला लस मिळणे बंद झाले आहे. शासनाला निधीसह रुग्णसेवेच्या अनेक बाबीत मदत करणाऱ्या संस्थानला खासगी यादीत समावेश करणे अन्यायकारक आहे. शिर्डीत शासकीय केंद्र नसल्याने लसीकरण प्रक्रियाच पूर्णपणे थांबली आहे. ज्या नागरिकांकडे वाहनांच्या सुविधा आहेत ते नोंदणी व धावपळ करून जवळपासच्या गावांत व तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, सर्वसामान्य नागरिक लसीपासून पूर्णपणे वंचित राहत आहे, असे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. निवेदनावर विकास गोंदकर, संपत हतांगळे, अनिल धिवर, विकी कांबळे, कैलास भुजबळ, राहुल देशमुख, कुणाल सांबारे, ज्ञानेश्वर जगदाळे, गोरख पवार आदींची नावे आहेत.