Lok Sabha Election 2019 : शिर्डीसाठी आजपासून रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:38 PM2019-04-02T13:38:26+5:302019-04-02T13:39:40+5:30

शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना २ एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली.

Starting from here today for Shirdi | Lok Sabha Election 2019 : शिर्डीसाठी आजपासून रणधुमाळी सुरू

Lok Sabha Election 2019 : शिर्डीसाठी आजपासून रणधुमाळी सुरू

अहमदनगर : शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना २ एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिर्डीसाठीही जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज प्रक्रिया पार पडणार आहे.
शिर्डीसाठी २ ते ९ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १० एप्रिलला छाननी होईल. १२ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण १७१० मतदान केंद्र आहेत. ८ लाख १० हजार ८८९ पुरूष व ७ लाख ५० हजार ६०६ स्त्रिया असे एकूण १५ लाख ६१ हजार ५५० मतदार या मतदारसंघात आहेत. एकूण साडेतीन हजार मतदान यंत्र वापरण्यात येणार असून साडेसात हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान प्रक्रियेसाठी केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी रोहयोचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल. उमेदवारांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येईल.

Web Title: Starting from here today for Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.