आजपासून अकरावीचे प्रवेश सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:47 AM2018-06-14T10:47:36+5:302018-06-14T10:47:52+5:30
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदानित तुकड्यांत प्रवेश मिळेल, असा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.
अहमदनगर : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदानित तुकड्यांत प्रवेश मिळेल, असा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.
येथील न्यू आर्टस महाविद्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण अधिकारी लक्ष्मण पोले यांनी जाहीर केले आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या अर्ज वाटपास कनिष्ठ महाविद्यालयांत प्रारंभ झाला आहे. शहरासह जिल्ह्यांत अकरावी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या ७५२ तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रवेश क्षमता ६७ हजार २२१ एवढी आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना आधी विना अनुदानित आणि नंतर अनुदानित तुकड्यांतील जागा भरल्या जात असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार अनुदानित तुकड्यांची प्रवेश प्रक्रिया प्रथम राबविणे सक्तीचे करण्यात आले आहे. माध्यमिक शाळेशी संलग्न, उच्च माध्यमिक वर्ग, स्वतंत्र उच्च माध्यमिक विद्यालय आणि स्वयं अर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या ८० इतकी आहे. वरिष्ठ महाविद्यालयाशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना मात्र १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुभा आहे. अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांच्या एकूण तीन गुणवत्ता याद्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रसिध्द केल्या जाणार आहे.
तिनही गुणवत्ता याद्या प्रसिध्द होईपर्यंत विद्यार्थ्यांना थांबावे लागेल़ अनुदानित तुकडीत प्रवेश न मिळाल्यास सर्वात शेवटी विना अनुदानित तुकड्यांची यादी प्रसिध्द होईल.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश
अनुसूचित जाती.................. १३ टक्के
एसटी अनुसूचित जमाती........ ७ टक्के
ओबीसी........................... १९ टक्के
नागरिकांचा मागास प्रवर्ग......... २ टक्के
एनटी (अ).......................... ३ टक्के
एनटी(ब).................. २़५ टक्के
एनटी (क)...................... ३़५ टक्के
एनटी (ड)..................... २ टक्के़
काय आहे नियम
माध्यमिक शाळा असल्यास २० टक्के
स्वातंत्र्य सैनिक व बदली पालक- ५ टक्के
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील कामगिरी करणाऱ्यांसाठी ५ टक्के
अपंगांसाठी ३ टक्के जागा
अनुदानित अकरावीसाठी ३९५ तर बारावीसाठी ४१० शुल्क
अनुदानित कॉलेजांमध्ये साधारणपणे अकरावीसाठी ३९५ रुपये, तर बारावीसाठी ४१० रुपये शुल्क आकारण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विनाअनुदानित तत्त्वावरील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी सरकार निर्णयाप्रमाणे शुल्क निश्चित करून आकारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अकरावी प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक
प्रवेश अर्ज वाटप व स्वीकृती................................ १३ ते १७ जून
प्राप्त सर्व अर्जांचे संगणकीकरण......................... १८ जून
सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे...... १९ जून
प्राथमिक गुणवत्ता यादीवर आक्षेप मागविणे.................... २० व २१ जून
सर्व विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे........... २२ जून
गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश देणे................................ २३ ते २५ जून
प्रतीक्षा यादी क्रमांक - १ जाहीर करणे.................... २६ जून
प्रतीक्षा यादी क्रमांक - १ प्रमाणे प्रवेश.................... २७ व २८ जून
प्रतीक्षा यादी क्रमांक - २ जाहीर करणे........................ २९ जून
प्रतीक्षा यादी क्रमांक - २ प्रमाणे प्रवेश................... ३० जून ते २ जुलै
प्रतीक्षा यादी क्रमांक ३ जाहीर करणे............................. ३ जुलै
प्रतीक्षा यादी क्रमांक ३ प्रमाणे प्रवेश............................ ५ व ६ जुलै
विनाअनुदानित तुकड्यांची यादी जाहीर करणे व प्रवेश देणे... ७ ते ११ जुलै
अकरावीचे वर्ग सुरू............................................... १२ जुलै