गुगळे उद्योग समूहाचा राज्य पातळीवर लाैकीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:35 AM2021-02-06T04:35:01+5:302021-02-06T04:35:01+5:30

जामखेड : कापड दालन व बायोटेक प्रकल्पांनी एच. यू. गुगळे उद्योग समूहाने राज्यपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. सर्वसामान्यांचा विश्वास संंपादन ...

The state-of-the-art Google Group | गुगळे उद्योग समूहाचा राज्य पातळीवर लाैकीक

गुगळे उद्योग समूहाचा राज्य पातळीवर लाैकीक

जामखेड : कापड

दालन व बायोटेक प्रकल्पांनी एच. यू. गुगळे उद्योग समूहाने राज्यपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. सर्वसामान्यांचा विश्वास संंपादन करून ते उत्तम सेवा देत आहेत. हेच

त्यांच्या यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी

गायकवाड यांनी केले.

जामखेड शहरातील नगर रस्ता येथे एच. यू. गुगळे

समुहाच्या इको स्मार्ट ई-व्हेईकल या इलेक्ट्रिक चार्जिंगवर

चालणाऱ्या टू व्हीलरच्या दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी ते बोलत

होते.

यावेळी उद्योग समूहाचे प्रमुख रमेश गुगळे, सहाय्यक

पोलीस निरीक्षक विठ्ठल जानकर, शांतीलाल गुगळे, कुंभार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल राऊत,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, माजी नगराध्यक्ष ॲड. अरुण जाधव, अशोक शिंगवी, विवेक बोथरा, वैभव कुलकर्णी, विजय धुमाळ आदी

उपस्थित होते.

फोटो : ०४ जामखेड गुगळे

जामखेड येथे एच. यू. गुगळे उद्योग समुहाच्या टू व्हीलर दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले.

Web Title: The state-of-the-art Google Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.