केडगाव हत्याकांडाला राठोडांकडून राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:34 PM2018-05-19T12:34:48+5:302018-05-19T12:39:57+5:30

केडगाव हत्याकांडाला माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

State color from Rathod to Kedgaon killer | केडगाव हत्याकांडाला राठोडांकडून राजकीय रंग

केडगाव हत्याकांडाला राठोडांकडून राजकीय रंग

ठळक मुद्देपोलिसांचा खळबळजनक अहवालराजकीय स्वार्थासाठी राठोड टोकाची भूमिकाही घेतील

अहमदनगर : केडगाव हत्याकांडाला माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेला शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय रंग दिला जात आहे. शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी नि:पक्षपातीपणे तपास करणाऱ्या यंत्रणेवरच संशय घेतला जात आहे. त्यामुळे केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा अहवाल चक्क जिल्हा पोलीस प्रशासनाने गृहविभागाकडे पाठविला आहे़ त्यामुळे राठोड अडचणीत सापडले आहेत. 
केडगाव हत्याकांडाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग करण्यासंदर्भात पोलिसांनी १४ मे रोजी पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठविला होता. हा अहवाल गेल्यानंतर दुसºयाच दिवशी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासंदर्भात आदेश काढण्यात आला. पोलिसांनी या अहवालात हत्याकांड घडल्यानंतर अनिल राठोड यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक खेडकर व शिवसेनेची महिला आघाडीची कार्यकर्ता, शिवसेना शहर प्रमुख यांच्या राजकीय हस्तक्षेपाची यादीच सादर केली आहे. 
शिवसैनिकांना अटक सुरु होताच मयत ठुबे व कोतकर कुटुंबीयांना उपोषण करण्यासाठी राठोड यांनी प्रोत्साहन दिले. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास जिल्ह्यात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व परिस्थितीत अनिल राठोड, खेडकर हे गंभीर परिस्थिती व अडचणी निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत. राजकीय स्वार्थासाठी राठोड हे भयंकर प्रयत्नशील असून, ते टोकाची भूमिका घेण्यासही कचरणार नाहीत, अशी शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी व मयतांच्या कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे हत्येचा तपास सीआयडीकडे द्यावा, असे या अहवालात म्हटले आहे.

स्थानिक शिवसेना पोलिसांबाबत पूर्वग्रहदूषित
स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते नगर शहर पोलिसांबाबत पूर्वग्रहदूषित आहेत़ केडगाव येथील तोडफोडीच्या गुन्ह्यात शिवसैनिकांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी दबाव निर्माण करत आहेत, असे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. अखेर राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून पोलिसांनी हा तपास सीआयडीकडे देण्याची विनंती केली. हा तपास सीआयडीकडे गेल्याने नेमका काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसैनिकांना अटक होताच दबावतंत्र
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून सेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. या घटनेच्या अनुषंगाने एकूण तीन गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्यात शिवसेनेचे नेते व पदाधिकारी आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यास सुरूवात केल्यानंतर या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. 

Web Title: State color from Rathod to Kedgaon killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.