राज्याचे ऊर्जा धोरण अंतिम टप्प्यात; प्राजक्त तनपुरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:24 AM2020-05-09T11:24:25+5:302020-05-09T11:25:02+5:30
महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत माध्यमांशी बोलताना दिली.
राहुरी : महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिका-यांशी चर्चा केली. सुमारे तीन तास ही चर्चा सुरूच होती. या चर्चेमध्ये शेतीपंपांना नवीन कनेक्शन देताना वेळ लागू नये, यासाठी सुसूत्रता आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना अनेक पायाभूत सुविधांसाठी वंचित राहावे लागत आहे. त्या संदर्भात पायाभूत सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय वसुलीच्या धोरणांवर भर देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर लवकरच राज्यातील शेतकºयांसाठी अनेक चांगल्या योजना उपलब्ध होणार आहे. नवीन कृषी विषयक धोरण शेतकºयांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास शेतकºयांना फायदेशीर ठरेल, असा विश्वासही मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला.