राज्य सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:09+5:302021-06-27T04:15:09+5:30
विखे म्हणाले, आघाडी सरकार मूग गिळून बसले आहे. आरक्षणामुळे मराठा, ओबीसी समाजाच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, पण या ...
विखे म्हणाले, आघाडी सरकार मूग गिळून बसले आहे. आरक्षणामुळे मराठा, ओबीसी समाजाच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, पण या सरकारने तेही हिसकावून घेतले. सध्या शासकीय बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. या बदल्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामुळे राहुरीचा कारखाना सुरू होणार आहे. कोणी काही वावडे उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. येणाऱ्या काळात राहुरी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार आहे.
कर्डिले म्हणाले, आघाडी सरकारने जनतेला वेगवेगळी आश्वासन दिली होती, पण ती पूर्ण न केल्याने राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाला ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उघडता आले नाही. ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे काम या आघाडी सरकारने केले आहे.
यावेळी रावसाहेब तनपुरे, अमोल भनगडे यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेव ढोकणे, दादा सोनवने, दत्तात्रय ढुस, शामराव निमसे, सुरसिंगराव पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, अमोल भनगडे, सुरेश बानकर, नानासाहेब गागरे, उत्तमराव म्हसे, भय्यासाहेब शेळके, राजेद्र उंडे, अण्णासाहेब शेटे, गणेश खैरे, कुलदीप पवार सहभागी झाले.