शेवगावला जोडणारे राज्यमार्ग ठरतायेत जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:00+5:302020-12-30T04:28:00+5:30
वाहनातून प्रवास, तसेच शेतमालाची वाहतूक करणेही जिकरीचे झाले आहे. खराब रस्त्यांचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो आहे. मान्सूनदरम्यान २२० ...
वाहनातून प्रवास, तसेच शेतमालाची वाहतूक करणेही जिकरीचे झाले आहे. खराब रस्त्यांचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो आहे.
मान्सूनदरम्यान २२० टक्के झालेल्या पावसाने नेवसा- शेवगाव-गेवराई राज्य मार्ग क्र. ५०, पांढरीपूल- मिरी- शेवगाव राज्य मार्ग क्र. ५२, तीसगाव- शेवगाव- पैठण राज्य मार्ग क्र. ६१ सह तालुक्यातील वाड्यावस्त्यांना, गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधीची कमतरता असल्याची माहिती मिळत आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना खराब रस्त्यांमुळे शेतमालाची वाहतूक करणे अवघड होऊन बसले आहे. अगोदरच होरपळलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खराब रस्त्यांवरून वाहनांना अंतर पार करण्यासाठी दुप्पट वेळ लागत असून, या रस्त्यांवरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
...
टोल चुकविण्यासाठी वाहनांची वर्दळ
पुणे, शिक्रापूर, चाकण, तळेगाव येथून पांढरीपूल, मिरी, शेवगावमार्गे जालन्याकडे जाणारे मोठाले कंटेनर, अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टोल चुकवण्यासाठी वाहनचालक या पर्यायी मार्गाला पसंती देत आहेत. वर्षभरात २२ जणांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, तर १३ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. नियमित नोकरीच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना मणक्याच्या व्याधीने ग्रासले आहे.
.....
ओळी : शेवगाव ते पैठण व मिरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
..
फोटो-२९ शेवगाव पैठण व मिरी रोड
...