समता स्कूलच्यावतीने राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:21+5:302021-09-11T04:22:21+5:30

कोपरगाव : राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ६८ ...

State level Wiz Kids competition organized by Samata School | समता स्कूलच्यावतीने राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे आयोजन

समता स्कूलच्यावतीने राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे आयोजन

कोपरगाव : राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ‘विझ किड्स स्पर्धेचे’चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेबाबतची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे यांनी दिली. या स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी ज्युनिअर गट व आठवी ते दहावी असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण तीन फेऱ्या असतील, पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयासह कोणत्याही एका कलागुणाचे सादरीकरण करून आपला व्हिडीओ संयोजकांना पाठवावयाचा आहे. दुसरी फेरी ही वन-टू-वन इंटरव्ह्यूची असणार आहे. यामध्ये एक तज़्ज्ञ परीक्षक पहिल्या राउंडमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहे. या फेरीमधून तिसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तिसरी फेरी ही अंतिम फेरी असेल. या फेरीत ज्युरी पॅनेल फेरी असेल. या फेरीत ज्युरी पॅनेल विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील.

(वा. प्र.)

Web Title: State level Wiz Kids competition organized by Samata School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.