राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : ‘द ग्रेट एक्सचेंज’ नगर केंद्रात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:24 PM2018-12-05T16:24:58+5:302018-12-05T16:58:30+5:30
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून नगर अर्बन बँकेच्या कला व क्रिडा मंडळाने सादर केलेल्या
अहमदनगर : ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून नगर अर्बन बँकेच्या कला व क्रिडा मंडळाने सादर केलेल्या ‘द ग्रेट एक्सचेंज’ या नाटकाने प्रथम पारितोषिक तर रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘अशुद्ध बीजापोटी’ या नाटकाने द्धितीय पारितोषिक पटकावले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बुधवारी (दि़५) नगर केंद्रावरील निकाल जाहीर केला़ स्पर्धेतील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- विश्वकर्मा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, अहमदनगर या संस्थेच्या ‘बाईपण’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे़ दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक क्षितिज झावरे (नाटक- द ग्रेट एक्सचेंज, द्वितीय पारितोषिक नानाभाऊ मोरे (नाटक-अशुध्द बीजापोटी), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अपुर्व मुळे (नाटक-बाईपण), द्वितीय पारितोषिक साईशेखर वाघ (नाटक-तिस तेरा), नेपथ्य प्रथम पारितोषिक धनश्री खोले (नाटक-द ग्रेट एक्सचेंज), द्वितीय पारितोषिक अनंत रिसे (नाटक- आणखी एक द्रोणाचार्य, रंगभूषा : प्रथम पारितोषिक अंजना मोरे (नाटक-अशुध्द बीजापोटी), द्वितीय पारितोषिक सुनिता शर्मा (नाटक-इथॉस), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक क्षितिज झावरे (नाटक-द ग्रेट एक्सचेंज) व अंजली गुंडे (नाटक-अशुध्द बीजापोटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सर्वज्ञा कराळे (नाटक-अशुद्ध बिजापोटी), कावेरी फटांगरे (नाटक-अनफेअर डील, अमृता श्रीगोंदेकर (नाटक-बाईपण), शितल परदेशी (नाटक-छत्रपती शिवरायांचा जिहाद, दीपक शर्मा (नाटक-इथॉस), सतिश लोटके (नाटक - तीस तेरा), शैलेश देशमुख (नाटक- मुंबई मान्सून, श्रेणीक शिंगवी (नाटक- आणखी एक द्रोणाचार्य).