संघर्ष क्रांतीचे इंधन दरवाढीच्या विरोधात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:19+5:302021-06-17T04:15:19+5:30
श्रीगोंदा : येथील संघर्ष क्रांती सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इंधन दरवाढ, खाद्यतेल दरवाढ व घरगुती गॅस दरवाढीबाबत अप्पर तहसीलदार चारुशीला ...
श्रीगोंदा : येथील संघर्ष क्रांती सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इंधन दरवाढ, खाद्यतेल दरवाढ व घरगुती गॅस दरवाढीबाबत अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन दिले.
सध्या देशभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल १०० रुपये लिटर, डिझेल ९४ रुपये लिटरवर पोहोचले आहे. घरगुती गॅस सिलिंडरही ८०० रुपयांहून अधिक किमतीला विकले जात आहे. खाद्यतेलाचेही भाव वाढलेले आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईही वाढत आहे. कोरोनाने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्य, केंद्र शासनाने अशा प्रकारची इंधन दरवाढ करू नये, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी ज्ञानेश्वर खेतमाळीस, प्रसाद इंगळे, भाऊसाहेब काळे, संजय ससाणे, कुंडलिक घालमे, संजय आनंदकर, नीलेश निंभोरे, प्रज्ज्वल गवळी, सागर बेल्हेकर, डॉ. नवीन यादव, योगेश दरेकर, अक्षय खोडवे, नितीन ठोंबरे, आदी उपस्थित होते.
---
१६ श्रीगोंदा रयत क्रांती