भाजप महिला अल्पसंख्याक आघाडीचे उपायुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:05+5:302021-03-27T04:21:05+5:30
अहमदनगर : अहमदनगर शहराच्या अनेक भागात फेज-२ पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, या भागातील रहिवाशांकडे जुने नळ कनेक्शन जोडण्यासाठी ...
अहमदनगर : अहमदनगर शहराच्या अनेक भागात फेज-२ पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, या भागातील रहिवाशांकडे जुने नळ कनेक्शन जोडण्यासाठी पैशांची मागणी महानगरपालिकेकडून होत आहे. ही बाब अतिशय अन्यायकारक असून, याबाबतचे निवेदन भाजप महिला अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले. यावेळी भाजप महिला अल्पसंख्याक आघाडीच्या सरचिटणीस फरीदा लतीफ शेख, हुसेना शेख, शेख नाजनीन, शेख हसीना, शेख कौसर, शेख रजिया, शेख शमीम, शेख नसीम, अल्पसंख्याक आघाडीप्रमुख हाजी अन्वर खान आदी उपस्थित होते.
कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून सावरत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. कुटुंब चालवणे जिकरीचे झाले आहे. आर्थिक चणचणीमुळे सर्वसामान्यांना खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण होत आहे, अशा परिस्थितीत मनपाकडून खासगी ठेकेदारामार्फत नळ कनेक्शनचे काम सुरु आहे. नागरिकांकडे पैसै मागून हे काम केले जात असल्याचे भाजपने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास हे काम होणार नाही, असे धमकावले जात असल्याचे भाजपने म्हटले आहे.