नेवासा येथे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:43+5:302021-09-16T04:27:43+5:30
नेवासा : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यांत होत असलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात याबाबतचे निवेदन भाजप ओबीसी ...
नेवासा : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यांत होत असलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात याबाबतचे निवेदन भाजप ओबीसी सेलच्या वतीने तहसीलदार रूपेश सुराणा यांना देण्यात आले. धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता, तर ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहील, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ओबीसी मोर्चा ज़िल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, ज़िल्हा सचिव विवेक नन्नवरे, जना जाधव, अजितसिंग नरूला, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष आयनर, मनोज साखरे, कृष्णा डहाळे, प्रतीक शेजूळ, आकाश गायकवाड, आदिनाथ पटारे उपस्थित होते.