शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांबाबत तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:47+5:302021-03-29T04:14:47+5:30

अकोले : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड ...

Statement to the Tehsildar regarding the issues of farmers and laborers | शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांबाबत तहसीलदारांना निवेदन

शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांबाबत तहसीलदारांना निवेदन

अकोले : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, अपंग व निराधारांचे शासकीय मानधन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत कारवाई करून निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यावर वर्ग करावे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत. बांधकाम कामगारांचे नोंदणी नूतनीकरण करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन दिले.

या मागण्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले जातील, असे आश्वासन यावेळी तहसीलदार कांबळे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, राजाराम गंभिरे, भीमा मुठे, देवराम उघडे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ उपस्थित होते.

...

आरोग्यधिकाऱ्यांना निवेदन

शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे यांचीही भेट घेतली. तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबतची आग्रही भूमिका मांंडली. आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचारिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

..

फोटो-२८अकोले निवेदन

...

ओळी- शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन अकोलेत तहसीलदारांना दिले. याप्रसंगी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Statement to the Tehsildar regarding the issues of farmers and laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.