ट्रॅक्टरमधून चोरी छुपे वाळूची वाहतूक, १५ लाखांचा ऐवज जप्त 

By अण्णा नवथर | Published: January 4, 2024 03:52 PM2024-01-04T15:52:18+5:302024-01-04T15:52:52+5:30

शेवगाव तालुक्यात वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टवर व डंपर , असा १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 

Stealing hidden transport of sand from tractor 15 lakhs compensation seized | ट्रॅक्टरमधून चोरी छुपे वाळूची वाहतूक, १५ लाखांचा ऐवज जप्त 

ट्रॅक्टरमधून चोरी छुपे वाळूची वाहतूक, १५ लाखांचा ऐवज जप्त 

अण्णा नवथर, अहमदनगर: स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून, शेवगाव तालुक्यात वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टवर व डंपर , असा १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 

शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे वाळूची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टर ( एमएच १६, बीवाय ६१५९)  पकडला असून,  चालक शत्रुघ्न रोहिदास मोटकर ( वय २३, रा. मुंगी, ता. शेवगाव ) यास अटक करण्यात आली आहे. ही दुसरी कारवाई शेवगाव तालुक्यातील हदगाव येथे करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाचा काचेवर इंग्रजीम ओमसाई लिहिलेटा डंपर वाळूसह ताब्यात घेण्यात आला असून, दोन्ही कारवाया दरम्यान १५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

याबाबत सविस्तर माहिती, अशी की शेवगाव तालुक्यात शासकीय वाळूची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश बाहेर यांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील मुंगी व हादगाव परिसरात सापळा रचला. तेंव्हा वरील दोन वाहने वाळूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कुठलाही परवाना मिळून आला नाही. ही कारवाई पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, किशाेर शिरसाट, संतोष लोंढे आदींच्या पथकाने केली. या भागात यापूर्वीही पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Stealing hidden transport of sand from tractor 15 lakhs compensation seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.