सावत्र मुलाचा बापाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:11 PM2018-10-12T14:11:05+5:302018-10-12T14:11:40+5:30

पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे झाली.

Stepchildren | सावत्र मुलाचा बापाने केला खून

सावत्र मुलाचा बापाने केला खून

टाकळी ढोकेश्वर : पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे झाली. खून करुन या मुलाचे प्रेत खडकवाडी परिसरातील मांडओहळ धरणाच्या पाईप लाईनच्या कोरड्या कालव्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जावेद सुरतने (रा.सायखेडा,ता.संग्रामपूर,जि.बुलढाणा) यास पोलिसांनी अटक केली आहे. जावेद त्याच्या पतीसह खडकवाडी (ता.पारनेर) येथील सचिन सोनबा ढोकळे यांच्या पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून कामास होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनर्ष खेळण्यासाठी घरातून बाहेर गेल्याच्या कांगावा वडिल जावेद सुरतने यांनी केला होता. गुरुवारी सकाळी त्याचा शोध घेतला असता पोल्ट्री फॉर्मजवळच असलेल्या मांडओहळ धरणाच्या १५ फूट खोल असलेल्या पाईप लाईनच्या कालव्यात चिमुकल्याचा मृत्यूदेह सापडला होता. त्यानंतर उत्तरीय तपासणी साठी मृतदेह अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तपासणी अंती त्याचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दीड महिन्यापासून जावेद सुरतने (रा.सायखेडा,ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) हे त्यांच्या पत्नीसह खडकवाडी(ता.पारनेर) येथील सचिन सोनबा ढोकळे यांच्या पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून कामाला आले होते. चिमुकल्याला शाळेत पाठवायचे होते. शाळेत नाव कोणाचे टाकायचे हा प्रश्न जावेदसमोर पडला होता. त्यामुळे हा मुलगा आपल्या संसारातच नको असा विचार करून जावेदने चिमुकल्याची जीवन यात्रा संपून टाकली.
पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक भोसले, संतोष शेळके, निवृत्ती साळवे, शरद पवार करत आहेत.

Web Title: Stepchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.