आदिवासींच्या जीवाशी आजही खेळ सुरुच, मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 11:47 AM2023-08-01T11:47:47+5:302023-08-01T11:49:33+5:30
आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.
संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडी मधील तास टेक वाडी ते घारगाव रस्त्याची दुरावस्था बघता कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष दिसत नाही. टास टेक वाडी मध्ये साडेतीनशे ते चारशे लोक राहतात. जगाने एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. परंतु या आदिवासी भागात आजही जाण्या-येण्याचा मार्ग खूप खडतर आ.हे पाण्या पावसाच्या दिवसात मुलांना अक्षरशः शाळेत येणं जाणं देखील कठीण होत आहे.
शासनाचे आठ वर्षांपासून 45 घरकुल यांना मंजुर आहेत. परंतु फक्त कागदावरच ते काय प्रत्यक्षात अमलात येत नाही. परंतु याकडे ना शासनाचे लक्ष नाही. स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष त्यामुळे ही आदिवासी जनता पूर्ण मेटा कुटीला आली असून यांनी आता मतावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच येथील स्थानिकांनी दिला आहे. एकीकडे शासन आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.