पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा; संगमनेरात पोलिसांची कारवाई

By शेखर पानसरे | Published: September 22, 2023 01:58 PM2023-09-22T13:58:31+5:302023-09-22T13:59:23+5:30

एकाविरोधात गुन्हा दाखल

Stock of prohibited panmasala, aromatic tobacco in leaf sheds; Police action in Sangamner | पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा; संगमनेरात पोलिसांची कारवाई

पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा; संगमनेरात पोलिसांची कारवाई

संगमनेर : पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा केला असल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली, त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. छापा टाकून २८,९८० रुपयांचा गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  

संपत नानासाहेब घुले (वय ३७, रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवला प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू पोलिसांनी जप्त केली. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Stock of prohibited panmasala, aromatic tobacco in leaf sheds; Police action in Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.