घरात साठविला फटाक्यांचा साठा; दोघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:22 PM2020-10-18T12:22:01+5:302020-10-18T12:22:53+5:30
नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका शेतातील घरात विनापरवाना साठवून ठेवलेले १० लाख ९० हजार रुपयांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.
अहमदनगर : नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका शेतातील घरात विनापरवाना साठवून ठेवलेले १० लाख ९० हजार रुपयांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.
या प्रकरणी घराचा मालक बापू एकनाथ आमले (रा. अरणगाव) व फटाक्यांचा मालक दत्तात्रय गोरखनाथ वाबळे (रा.पाईपलाईन रोड) यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरणगाव येथील शेतातील घरात विनापरवाना फटाक्यांचा साठा ठेवल्याबाबतची माहिती उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला तेव्हा आमले यांच्या घरात १० लाख ९० हजार रुपये किमतीचे फटाक्यांचे १०९ बॉक्स ठेवल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी फटाक्यांचा मालक दत्तात्रय वाबळे यालाही बोलून घेतले. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.