जावयांसाठी साडेतीन हजार पोळ्याची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:44 PM2018-06-06T15:44:18+5:302018-06-06T15:49:03+5:30
धोंड्याचा महिना आला की सासरवाडीत जावयांसाठी मेजवानी दिली जाते. जावयाला धोंड्याचे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. याच नगर तालुक्यातील गावानं गावच्या जावयांचा एकत्रितपणे धोंड्याची मेजवानी दिली. तब्बल ११० जावयांसाठी साडेतीन हजार पोळ््यांसह इतर मिष्टांन्नाने जावयांचा धोंडा साजरा झाला.
नागेश सोनवणे
निंबळक : धोंड्याचा महिना आला की सासरवाडीत जावयांसाठी मेजवानी दिली जाते. जावयाला धोंड्याचे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नगर तालुक्यातील गावानं गावच्या जावयांचा एकत्रितपणे धोंड्याची मेजवानी दिली. तब्बल ११० जावयांसाठी साडेतीन हजार पोळ््यांसह इतर मिष्टांन्नाने जावयांचा धोंडा साजरा झाला.
नगर तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामस्थांनी गावातील सर्व जावयांना एकत्रितपणे धोंडा करण्याचे ठरले. तसेच गावात अधिक मासा निमित्त श्रीराम मंदिरात हनुमान महाराज लोटके यांचा किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जावयांना एकत्रित धोंडा खाऊ घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी होकार दिला. त्यानंतर गावक-यांची धावपळ सुरु झाली. पुरणाची पोळी, धोंडे, आमटी, भात, कुरडई, पापड अशा मिष्टान्नांची मेजवानी करण्यात आली. धोंड्याच्या स्वंयपाकासाठी आज पहाटेपासूनच गावातील सर्व महिला राबत होत्या. गावातील तरुणांनी पुरण तयार केले. साडेतीन हजार धोंडे, साडेतीन हजार पोळ्या, दोन मोठी पातेले आमटी, गुळवणी आणि भात बनविण्यात आला. यासाठी जवळपास गावातील नव्वद महिला राबत होत्या. जवळपास दोन हजार लोकांचा स्वंयपाक करण्यात आला. त्यानंतर जावयांना मान देत धोंड्याची मेजवानी देण्यात आली. एकत्रित धोंडा बनविण्याचे हे दुसरे वर्ष आहे. लोकवर्गणीतून खर्च करप्यात आला. या कार्यक्रमास भाजपाचे नेते माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी भेट देत धोंड्याचा आस्वाद घेतला.
यावेळी शाहुराव घोडके, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, हरीभाऊ कर्डीले, जयवंत शिंदे, सुनिल म्हस्के, साहेबराव म्हस्के, नाना गायकवाड, पोपटराव म्हस्के, दत्तात्रय बनकर, सुनिल म्हस्के, अंशाबापु म्हस्के, लक्ष्मण वाघ, संदिप ढेरे, संभाजी म्हस्के, महादेव म्हस्के, रेणुका शिंदे, चंद्रकला पोटरे, लताबाई म्हस्के, यमुनाबाई वाघ, इंदुबाई सांळुके, दयाबाई जावळे, विजया काळभोर, वैशाली बनकर, मंदाबाई ढेरे, मिनाज शेख उपस्थित होते.