दुष्काळप्रश्नी रास्ता रोको

By Admin | Published: August 7, 2014 11:51 PM2014-08-07T23:51:41+5:302014-08-08T00:09:12+5:30

अमरापूर येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the drought-proof way | दुष्काळप्रश्नी रास्ता रोको

दुष्काळप्रश्नी रास्ता रोको

शेवगाव : शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्यावतीने गुरुवारी तालुक्यातील अमरापूर येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रशासनाच्या कामांच्या तक्रारींचा पाढा वाचला.
पावसाअभावी शेवगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी पाऊस नसल्याने भीषण पिण्याचे पाणी, चारा टंचाई आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेती व शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे अडचणीत आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीतून शेवगाव तालुक्याला वगळण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी अंबादास नाकाडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. महसूल यंत्रणेचे जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी हजर नसल्याने खात्याच्या कामकाजाविषयी आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला.
शासनाला ‘लक्ष्य’
शासनाने मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे यांनी दिला. शशिकांत कुलकर्णी, बापूराव राशीनकर, संजय नांगरे, कारभारी वीर, राम पोटफोडे यांचीही यावेळी भाषणे झाली. त्यांनी शासनाला ‘लक्ष्य’ करुन धोरणावर टीका केली.
विविध मागण्या
सन २०१३-१४ च्या टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत शेवगाव तालुक्याचा तातडीने समावेश करावा, सन २०१२-१३ च्या खरीप हंगामाच्या विमा भरपाईच्या रकमेत हरभरा पिकाचा समावेश नसल्याने अनेकांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे हरभरा पिकाची तातडीने नुकसान भरपाई मिळावी, गारपिटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stop the drought-proof way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.