पुणतांबा-रस्तापूर शिवारातील अवैध वाळू वाहतूक बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:40 AM2021-02-28T04:40:02+5:302021-02-28T04:40:02+5:30
पुणतांबा-रस्तापूर शिवारातील अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी, राहाता तालुका तहसीलदार कुंदन हिरे यांना करण्यात आली. पुणतांबा-रस्तापूर, शिंगवे या ...
पुणतांबा-रस्तापूर शिवारातील अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी, राहाता तालुका तहसीलदार कुंदन हिरे यांना करण्यात आली.
पुणतांबा-रस्तापूर, शिंगवे या गावातील गोदावरी नदीपात्रातून जेसीबी व ७० ते ७५ टन वजनाच्या १२ ते १३ डंपरच्या साहाय्याने रात्री होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी. या वाळू वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले असून, राहाता तहसीलदार यांनी लक्ष घालून वाळू उपसा बंद करावा. हे वाळूचोर महसूल विभागाला जुमानत नसतील तर १० ते १२ टन ब्रास वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबर प्लेटवाल्या ७० टनाच्या डंपर ऐवजी या वाळूचोरांना १ ब्रास वाळु, ७ टन वजनाच्या साधनाने वाळूचोरी करण्यास मुभा द्यावी, अशा आशयाचे निवेदन राहाता तालुका शिवसेना उपप्रमुख भास्कर दामोदर मोटकर यांनी राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांना दिले आहे.