पाथर्डीत रास्ता रोको; बसवर दगडफेक; शेतकऱ्यांनी दूध, कांदे रस्त्यावर ओतले
By Admin | Published: June 2, 2017 03:06 PM2017-06-02T15:06:23+5:302017-06-02T15:06:23+5:30
शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़
आॅनलाईन लोकमत
पाथर्डी, दि़ २ - मिरी-तिसगाव रोडवर मोहोज फाटा येथे जवखेडे खालसा येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले़ या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ पाथर्डी शहरातही सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
मोहोज फाटा येथील आंदोलनादरम्यान काही अज्ञात इसमांनी या मार्गावरुन जाणाऱ्या बसवर अचानक दगडफेक केली़ त्यामुळे काही काळ वातावरणात तणावपूर्ण शांतता पसरली होती़ या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या़ मोहोज देवढे फाटा येथे जवखेडे खालसा ग्रामस्थांनी दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला़ तसेच मिरी येथील आठवडे बाजारही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला होता़
पाथर्डी शहरातील नाईक चौकात शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे सतीष पालवे, रा. पा. शिरसाट, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, संदीप राजळे, भगवान आव्हाड, अरविंद सोनटक्के आदींनी रास्ता रोकोत सहभाग घेतला़