वाळू उपसा बंद करा; संगमनेरकर आक्रमक

By शेखर पानसरे | Published: April 12, 2023 12:53 PM2023-04-12T12:53:34+5:302023-04-12T12:53:49+5:30

गंगामाई घाट परिसरात आंदोलन

Stop pumping sand; Sangamnerkar aggressive | वाळू उपसा बंद करा; संगमनेरकर आक्रमक

वाळू उपसा बंद करा; संगमनेरकर आक्रमक

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसली जात असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा निवेदने देऊनही वाळू उपसा बंद होत नसल्याने नागरिकांनी बुधवारी (दि. १२) सकाळी शहरातील गंगामाई घाट परिसरात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात व्यापारी, व्यावसायिक, शिक्षक, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कासारा दुमाला (आडवी नदी) ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसली जाते आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळू उपसा बंद व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शहरातील प्रवरा नदीचा परिसर निर्सगरम्य आहे. येथे नगर परिषदेच्यावतीने सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, या परिसराची अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशाने मोठी हानी झाली आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून पोहायला अथवा गणेश विसर्जनासाठी आलेल्या अनेकांचा खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाला.

पुरातन व नवीन घाट देखील खचले आहेत. पात्रातील विहिरी व पाईप लाईन उघड्या पडल्या आहेत. विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाळू उपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Web Title: Stop pumping sand; Sangamnerkar aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.