सर्वसामान्य जनतेच्या कर्जाची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:14+5:302021-04-12T04:19:14+5:30

मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी नेवासा तहसीलला दिलेल्या निवेदनात केली आहे. अनेक गोरगरीब कुटुंबातील लोक हे हॉटेल, ...

Stop the recovery of public debt | सर्वसामान्य जनतेच्या कर्जाची वसुली थांबवा

सर्वसामान्य जनतेच्या कर्जाची वसुली थांबवा

मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष

गणेश झगरे यांनी नेवासा तहसीलला दिलेल्या निवेदनात केली आहे.

अनेक गोरगरीब कुटुंबातील लोक हे हॉटेल, कापड दुकान, किराणा दुकान, तसेच वेगवेगळ्या दुकानांमध्ये कामे करुन आपला उदरनिर्वाह करतात; परंतु सध्या लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे कामावर असलेले अनेक गोरगरीब सध्या घरी बसून आहेत. हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यातच कर्जपुरवठा करणाऱ्या अनेक बँकांकडून या सर्वसामान्य कर्जदारांकडे ‘मार्च एंड’च्या नावाखाली कर्जवसुलीसाठी सावकारी तगादा केला गेला.

लोकांची उपासमार होत असतांना खासगी बँकांकडून होत असलेल्या या कर्जवसुलीला आपल्या कार्यालयामार्फत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर गणेश झगरे यांसह महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले, सुभाष गागरे, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, अंकुश डांभे, कैलास रिंधे, कल्पना शेटे, मनिषा फरताळे, मनिषा निमसे, संगीता झगरे, अमोल म्हस्के, रावसाहेब कावरे, बाळासाहेब आढाव, सागर सरोदे, अविनाश कणगरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Stop the recovery of public debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.