शहरातील वाढती गुन्हेगारी रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:03+5:302021-02-13T04:21:03+5:30
यावेळी पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, विशाल शिंदे, नितीन लिगडे, गजेंद्र भांडवलकर, ...
यावेळी पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, विशाल शिंदे, नितीन लिगडे, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, विक्रांत दिघे, विशाल शिंदे, नीलेश घुले, लाला खान, मुजाहिद शेख, सैफअली शेख, शीतल राऊत, शीतल गाडे, उषाताई सोळंकी, सुनीता पाचारणे, लिलाबाई डाडर आदी उपस्थित होते.
शहरात विविध ठिकाणी चोरट्यांनी महिलांचे दागिने ओरबाडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरत असून, महिला एकट्या रस्त्याने जाण्यास घाबरत आहे. शहरात वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलीसांच्या विविध तुकड्या नेमाव्या, पोलिसांची गस्त वाढवावी आदी तातडीने उपाययोजना करण्याची यावेळी करण्यात आली.
.............
फोटो १२ निवेदन
ओळी- नगर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.