बोधेगावात रास्ता रोको : ईव्हीएम हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:33 PM2019-08-28T18:33:32+5:302019-08-28T18:33:36+5:30
आगामी विधानसभा निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, पैठण-पंढरपूर मार्गावरील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
बोधेगाव : आगामी विधानसभा निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, पैठण-पंढरपूर मार्गावरील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी बोधेगाव (ता. शेवगाव) येथे बन्नोमाँ दर्गासमोर बुधवारी (दि.२८) रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व भारिप बहुजन महासंघाचा आंदोलनात सहभाग होता.
देशभरात ईव्हीएमविरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बºयाच ठिकाणी आढळून आली. त्यामुळे ‘ईव्हीएम हटाओ-देश बचाओ’ असा एल्गार विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे. पैठण-पंढरपूर महामार्गावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करून रब्बी हंगामाचा पीक विमा देण्यात यावा, बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे, नवीन बसस्थानक बांधावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांच्या होत्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, प्रथमेश सोनवणे, ‘वंचित’चे संतोष बानाईत, राजू वीर, रावसाहेब निकाळजे, इस्माईल पटेल, बबन मिसाळ यांची भाषणे झाली. आंदोलनासाठी ‘एमआयएम’चे फारूक सय्यद, अविनाश खंडागळे, अन्सार कुरेशी, ‘जनशक्ती’चे माणिक गर्जे, विष्णू वीर, दिगंबर बल्लाळ, दत्तू कनगरे, सुनील घोरपडे, संजय बल्लाळ, सुरेश तोटारे, संजय वाल्हेकर, नबाब शेख, नवनाथ मिसाळ, अन्सार शेख, अनिस सय्यद, प्यारेलाल शेख, जमीर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नायब तहसीलदार शोभा माळी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.