कुकडीच्या पाण्यासाठी रास्ता रोको,उपोषण
By Admin | Published: December 23, 2015 11:20 PM2015-12-23T23:20:55+5:302015-12-23T23:25:29+5:30
श्रीगोंदा : कुकडीचा जोड कालवा व विसापूरचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लोणी व्यंकनाथ येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन व श्रीगोंदा येथे चोराचीवाडी ग्रामस्थांनी उपोषण केले.
श्रीगोंदा : कुकडीचा जोड कालवा व विसापूरचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लोणी व्यंकनाथ येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन व श्रीगोंदा येथे चोराचीवाडी ग्रामस्थांनी उपोषण केले. या आंदोलनामुळे कुकडी पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटला आहे.
कुकडीच्या अधिकाऱ्यांनी डी वाय ११ व १२ ला पूर्ण दाबाने पाणी मिळण्यासाठी दोन दिवसापूर्वी किमी १३२ चा जोड कालवा अचानक बंद केला. त्यामुळे लोणी व्यंकनाथ, चोराचीवाडी, बाबुर्डी येथील शेतकरी संतप्त झाले. विसापूरखालील खेडकर मळा चारीवरील भरणे होण्यापूर्वीच चारी बंद करण्यात आली. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोणी व्यंकनाथ येथील रास्ता रोको आंदोलनात नगरसेवक भरत नाहाटा, धर्मनाथ काकडे, मनेष जगताप, सुनील पाटील, गोरख जठार यांची भाषणे झाली. यावेळी गणपतराव काकडे, लालासाहेब काकडे, पांडुरंग काकडे, भाऊसाहेब डांगे, लियाकत तांबोळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)