पिकांवरील टॉनिक विक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:37 PM2017-10-25T13:37:40+5:302017-10-25T13:41:04+5:30
अहमदनगर : औषधांसोबत कृषी सेवा केंद्रातून विक्री केले जाणारे विविध प्रकारची जैविके (टॉनिक) विकण्यावर सरकारने बंदी घातली आहे़ त्यामुळे ...
अहमदनगर : औषधांसोबत कृषी सेवा केंद्रातून विक्री केले जाणारे विविध प्रकारची जैविके (टॉनिक) विकण्यावर सरकारने बंदी घातली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक कृषी सेवा केंद्रांमध्ये ही औषधी विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे़ जिल्हा परिषदेच्यावतीने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे़
चंद्रपूर येथील किटकनाशक फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जैविके विक्री सरकारने कायद्याच्या कक्षात आणली आहे़ पूर्वी जैविके कायद्याच्या कक्षात नव्हती़ त्यामुळे कृषी विभागाला कोणतीही कारवाई करता येत नव्हती़ मात्र, आता ही जैविके कायद्याच्या कक्षात आल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, जैविके विक्रीस जिल्ह्यात बंदी घातली आहे़ जिल्ह्यात एकूण २२०० कृषी सेवा केंद्रे आहेत़ या केंद्रांची तपासणी करुन कृषी सेवा केंद्रांकडून जैविके विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत़ जिल्ह्यात कोठेही जैविके विक्री होत नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़