भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:36 PM2020-01-25T12:36:56+5:302020-01-25T12:38:45+5:30

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.

The store will receive four revisions; Tomorrow's departure tomorrow | भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.
सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणा-या पाण्याच्या आवर्तनांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत लाभ क्षेत्रात पाऊस पडल्याने पाण्याची मागणी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही धरणांत पाणीसाठा जवळपास जैसे थे आहे. सध्या भंडारदरा धरणात १० हजार ८०३ दशलक्ष घनफूट तर निळवंडे मध्ये ७ हजार ९१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही धरणांमध्ये एकूण १८ हजार ७२१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी साठी एका आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. हे आवर्तन बुधवारी सोडण्याचे नियोजित होते. मात्र निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट कार्यान्वित झाले नाही. यांत्रिकी विभागामार्फत हे गेट दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. दोन दिवसांत हे गेट सुरळीत होईल आणि निळवंडे धरणातून रविवारी किंवा सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात होईल, असे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश हारदे यांनी सांगितले. 
 या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेने कमी आहे. या आवर्तनात सुमारे अडीच ते तीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता असून हे आवर्तन २५ दिवस चालण्याचा अंदाज सहायक अभियंता हारदे यांनी व्यक्त केला.
 रब्बीच्या आवर्तनानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याचे पहिले आवर्तन सुटणार असून त्यानंतर दोन असे उन्हाळ्यासाठी एकूण तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: The store will receive four revisions; Tomorrow's departure tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.