नगर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; संत्र्यांसह फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:49 PM2020-03-25T12:49:24+5:302020-03-25T12:50:50+5:30

खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.

Storms rained down on city taluka; Damage to orchards with oranges |  नगर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; संत्र्यांसह फळबागांचे नुकसान

 नगर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; संत्र्यांसह फळबागांचे नुकसान

केडगाव   : खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.
बाजारात नेण्यासाठी तयार झालेल्या संत्रा झाडावरुन गळून पडल्या. ५०  हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकट्या खडकीमध्ये १०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबागा लागवड आहे. मागील वर्षी २०१८-१९ च्या कडक दुष्काळातही टँकरने पाणी घालून कसे बसे फळबागा जगवल्या आहेत. २०९१ च्या पावसाळ्यात ही या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असताना येथील शेतकरी आजही  फळबागांना टँकरने पाणी घालत आहेत. त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख खर्च केला आहे. फळबागां विक्रीला आलेल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे माल विक्रीला जात नाही. त्यात वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात वादळी पावसाने संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु त्याचे पंचनामे झाले नाहीत. आता आम्ही सर्व व्हिडीओ काढून ठेवले आहेत. आता तरी कृषी अधिकाºयांनी योग्य तो अहवाल द्यावा आणि पंचनामे करावेत, असे खडकी येथील शेतकरी राहुल बहिरट यांंनी सांगितले.
आमच्या सारोळा गावातही वादळी वाºयासह जोरदार पावसाचा शिडकावा झाला. यात तोडणीसाठी तयार झालेले संत्रा फळे झाडावरून गळून नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास असा वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी भगवान डाके यांनी सांगितले. 
 

Web Title: Storms rained down on city taluka; Damage to orchards with oranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.