कान्हूर पठारसह १६ गाव पाणी योजनेसाठी पारनेर तहसीलमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:50 AM2018-04-07T11:50:15+5:302018-04-07T11:51:11+5:30
कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा नळयोजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार सागरे यांच्या दालताना ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
पारनेर : तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा नळयोजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार सागरे यांच्या दालताना ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
कान्हूर पठार पाणी पुरवठा योजनेवर पठार भागातील १६ गावे अवलंबून आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा योजना सुरळीत चालत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. जिल्हा परिषदेने कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी, या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य कॉ. आझाद ठुबे यांनी केले. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.