नगर जिल्ह्यातील कडक निर्बंध ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:39+5:302021-06-01T04:16:39+5:30

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी दिवसभर चर्चा ...

Strict restrictions in Nagar district 'as is' | नगर जिल्ह्यातील कडक निर्बंध ‘जैसे थे’

नगर जिल्ह्यातील कडक निर्बंध ‘जैसे थे’

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी दिवसभर चर्चा झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ग्रामीण क्षेत्र आणि महापालिका क्षेत्र असा एकच घटक घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा १० टक्क्यांच्या खाली असला तरी ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या ही ४० टक्क्यांच्यावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध पूर्णपणे शिथिल करू नयेत, असे बैठकीत सर्वांचेच एकमत झाले. त्यामुळे कडक निर्बंध ‘जैसे थे’च ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांना ग्रामीण क्षेत्रात सकाळी ७ ते ११ परवानगी होती. मात्र, महापालिका क्षेत्रात त्यावर निर्बंध होते. तेवढेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

--------------

वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी (सकाळी ७ ते ११)

किरकोळ किराणा दुकाने, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण), फळे विक्री, कृषी उत्पन्न बाजार समित्या, अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री, कृषी संबंधित सर्व दुकाने, पशुखाद्य विक्री, पेट्रोल पंप. हॉटेल, रेस्टाॅरंट, बार होम डिलिव्हरीसाठी चालू राहतील, दारूचे द्वार वितरण, सरकारी कार्यालयात १५ टक्के उपस्थिती, दूध संकलन, वाहतूक यांना पूर्ण परवानगी.

-------

हे पूर्ण बंदच राहणार

धार्मिकस्थळे, आठवडे बाजार, दारू दुकाने, खासगी कार्यालये, कटिंग, सलून दुकाने, शैक्षणिक संस्था, शिकवणी, विवाह समारंभ, चहाची टपरी, दुकाने, सिनेमा, सभागृह, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, व्यायामशाळा, मॉर्निंग वॉक, बेकरी, मिठाई दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने.

Web Title: Strict restrictions in Nagar district 'as is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.