श्रीरामपुरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:26+5:302021-04-05T04:18:26+5:30

प्रकाश चित्ते, डॉ. दिलीप शिरसाठ, मनसेचे बाबा शिंदे, नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र चव्हाण, संजय पांडे, दीपक दुग्गड, अभिजित कुलकर्णी, ...

Strictly closed in Shrirampur | श्रीरामपुरात कडकडीत बंद

श्रीरामपुरात कडकडीत बंद

प्रकाश चित्ते, डॉ. दिलीप शिरसाठ, मनसेचे बाबा शिंदे, नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र चव्हाण, संजय पांडे, दीपक दुग्गड, अभिजित कुलकर्णी, राजेंद्र बोलकर, सरपंच महेंद्र साळवी, सुभाष जंगले, मनोज हिवराळे यांनी पुढाकार घेतला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रश्नावर राजकारण करून गेलेली पत परत मिळविण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. व्यापारी व नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना स्वत: काय प्रयत्न केले हे जनतेला कळू द्या, असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे व नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केला आहे.

-------

छत्रपतींचा पुतळा खासदार गोविंदराव आदिक नाट्यगृहासमोर बसविणार ही अफवा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मानसन्मानाने शिवाजी चौकात पुतळा बसविणार आहे.

अनुराधा आदिक,

नगराध्यक्षा

--------

चार वर्षांपूर्वी शिवाजी चौकात जाऊन बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत नगराध्यक्षा आदिक यांनी जागेची पाहणी केली होती. आता मात्र नाट्यगृहासमोर पुतळा हलविण्याचा त्यांचा डाव होता. शिवप्रेमी जनतेच्या विरोधामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला.

किरण लुणिया,

नगरसेवक भाजप

---------

छत्रपतींच्या पुतळ्याकरिता दिवंगत नेते जयंत ससाणे यांनी निधी देऊन पुतळा तयार केला. नगराध्यक्षा आदिक व भाजपने मागील निवडणुकीत आश्वासन देऊनही त्यांना पुतळा बसविता आलेला नाही. आता आम्हीच पुतळ्याची स्थापना करून दाखविणार आहोत.

संजय छल्लारे,

शहराध्यक्ष, काँग्रेस पक्ष.

---------

फोटो ओळी : बंद

श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

-------

Web Title: Strictly closed in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.