प्रहार जनशक्तीचा निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:15+5:302021-05-16T04:19:15+5:30

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका यांच्या अथक परिश्रमातून राहाता तालुक्यात ...

Strike manpower to support the destitute | प्रहार जनशक्तीचा निराधारांना आधार

प्रहार जनशक्तीचा निराधारांना आधार

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका यांच्या अथक परिश्रमातून राहाता तालुक्यात चला गोरगरिबांची चूल पेटवू या हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील शिर्डी, राहाता, रुई, कोहकी, डोऱ्हाळे, नांदुर्खी खुर्द, बुद्रुक, कनकुरी, केलवड, आडगाव, गोगलगाव तसेच लोणी खुर्दमधील हातावर पोट असणारे मजूर, निराधार, दिव्यांग तसेच गोरगरीब कुटुंबांना थेट घरपोच किराणा देण्यात येत आहे.

सातशे रुपयांच्या या किटमध्ये आवश्यक असलेल्या ३१ वस्तूंचा समावेश आहे. तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, राहाता तालुका तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, दिव्यांग क्रांती उपतालुकाध्यक्ष नितीन भन्साळी, तालुका संघटक वसंतराव काळे, राहाता शहर प्रमुख अविनाश सनासे, संदीप शिंदे यांच्या पुढाकारातून हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे.

तालुक्यात आतापर्यंत दोनशेच्यावर किराणा किटचे वितरण करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजूंचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत किराणा पोहोचवण्याचे कार्य अविरत सुरू आहे. ज्या कार्यकर्त्यांची आर्थिक क्षमता आहेत त्यांच्या बरोबरच सामान्य कार्यकर्तेही यासाठी यथाशक्ती मदत करत आहेत, गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद आमच्यासाठी अमूल्य असल्याचे जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे यांनी सांगितले़

या उपक्रमासाठी दिव्यांग क्रांती जिल्हा संघटक शरद वारुळे, दिव्यांग तालुका अध्यक्ष भाऊनाथ गमे, लोणी खुर्दचे उपसरपंच अनिलराव आहेर, नांदुर्खी खुर्दचे ग्रामपंचायत सदस्य विजय वाणी, दीपक घोगरे, अशोकराव खंडागळे, विजय काकडे, जालिंदर लांडे, सोमनाथ लहामंगे, अमोल कडू, सुधाकर डांगे, रोमचंद कडू, जगन्नाथ सरोदे, मंगेश नळे, त्रिभुवन साहेब, सचिन आरणे, रवींद्र चौधरी, अमोल चौधरी, साईनाथ दाभाडे, सुरेश गुगळे, नवनाथ पुंड, विशाल दाभाडे, रामदास तनपुरे, जयदीप सोळशे आदी या उपक्रमासाठी मेहनत घेत आहेत.

Web Title: Strike manpower to support the destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.