पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:27 PM2019-06-22T15:27:03+5:302019-06-22T15:28:12+5:30

शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात गेल्या सहा महिन्यांपासून रात्री मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो-यांचे प्रकार वाढले आहेत.

Strong thief of Pathardi | पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ

पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ

पाथर्डी : शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात गेल्या सहा महिन्यांपासून रात्री मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो-यांचे प्रकार वाढले आहेत. चो-यांचा तपास लागत नसल्याने दहशतीखाली नागरिक रात्र जागून काढत आहेत.
शिक्षक कॉलनीतील मनोज म्हतारदेव गर्जे यांच्या मालकीचे १८ जूनला टायरच्या दुकातील २५ हजार रोकड तसेच १,८८,८५० रुपयाचे जेके कंपनीचे विक्रीकरिता ठेवलेले टायर असा एकूण २,१३,८५० रुपयांचा मुद्देमाल दुकानाचे शटर तोडून चोरून नेले आहेत. शहरातील जुन्या बस स्थानकात खुलेआम पाकीटमारी होत आहे. पोलिसांची गस्त नसल्याने गेल्या आठवड्यात नागरिकांनीच तिघा पाकीटमारांना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. याबाबत सचिन भगीरथ सोनटक्के यांच्या फियार्दीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध पाकीटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. दुलेचांदगाव येथील दीपक गर्जे यांच्या शेतातील राहत्या घरातून ३१ मे रोजी २६ हजारांच्या बक-या चोरी गेल्या. फिर्याद दाखल असूनही त्याबाबत अजून तपास लागलेला नाही. मुंगूसवाडे येथे इंदुबाई बबन हिंगे घराचा कडीकोयंडा तोडून मंगळवारी रात्री ते सोमवार ३ जूनच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी खोलीचा कडीकोयंडा तोडून पाच हजार रुपये रोख व ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
कसबा तसेच गाडगे आमराई परिसरात येथे शनिवारी पहाटे २ वाजल्याच्या सहा ते सात बनियान व अंडरपॅट असा वेश परिधान केलेल्या,ा कुलूप तोडण्याची टॉमी व कुकरी सारखे तीक्ष्ण हत्यारबंद असलेल्या चोरट्यांच्या टोळीने जीजाबाई बिडवे यांच्या कसबा येथील घरातून एक तोळ्याचे सोन्याचे अलंकार व पाच हजार रोकड आणि मीना संजय बांगर यांचे घाडगे आमराई येथल घरातून झोपलेल्या असताना अंगावरून एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल संच चोरून नेले.
पोलीसांचा रात्रीच्या गस्तीचा अभाव यामुळे शहरातील कसबा, आनंदनगर, नाथनगर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटयाचे चांगलेच फावत असल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली असून रात्र जागून काढावी लागत आहे.

Web Title: Strong thief of Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.