पाथर्डीत पाण्यासाठी ठिय्या; महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले रिकामे हंडे
By Admin | Published: May 24, 2017 01:44 PM2017-05-24T13:44:24+5:302017-05-24T13:44:24+5:30
महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.
आॅनलाईन लोकमत
पाथर्डी, दि़ २४ - तालुुक्यातील अकोला गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी सकाळी अचानक अकोला गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात सुमारे चार तास ठिय्या दिला. महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.
या आंदोलनाचे नेतृत्व पाथर्डी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सरपंच पुष्पा गर्जे, उपसरपंच नारायण पालवे यांनी केले. अकोला गावात तीव्र पाणी टंचाई असल्याने पाणी कोठून आणावे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. अकोला गावाला टँकरने पाणी मिळावे, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे १४ मे रोजी सादर केला होता. पंचायत समिती प्रशासन व तहसील प्रशासनाने सदर प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला़ परंतु अद्याप टँकर मंजूर न झाल्यामुळे बुधवारी सकाळीच गावातील महिला व पुरूष तहसीलदारांच्या दारात आले व त्यांनी ठिय्या दिला.
आंदोलनात आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, उद्धव माने, अॅड. संपत गर्जे, जमुना पंडित, मीना भागवत, सुरेखा गर्जे, सुलोचना गोसावी, तैनूर सय्यद, मीना गिरी, मीना भाबड, पद्मबाई गोसावी, नंंदा गोसावी, गणपत गर्जे, संभाजी गर्जे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या सहभागी झाले होते.