विद्यार्थी-महाविद्यालयाची प्रगती हेच ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:04+5:302021-06-01T04:16:04+5:30
श्रीगोंदा : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून काही प्राध्यापक सेवारत आहेत. त्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थी व महाविद्यालयाची प्रगती ...
श्रीगोंदा : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून काही प्राध्यापक सेवारत आहेत. त्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थी व महाविद्यालयाची प्रगती हेच येथे सेवारत असणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.
येथील छत्रपती महाविद्यालयात सोमवारी प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, उपप्राचार्य विलासराव जाधव आणि ग्रंथपाल डॉ. नारायण गवळी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते.
नागवडे म्हणाले, प्राचार्य डॉ. खांदवे यांनी शिस्तबद्ध व समंजसपणे काम करताना विद्यार्थी व महाविद्यालयाची प्रगती साधली. उपप्राचार्य जाधव यांनी महाविद्यालयाच्या खडतर काळात संघटन कौशल्याने सर्वांना बरोबर घेत काम केले. डॉ. गवळी यांनी महाविद्यालयीन कामकाजासह समाजकार्याचा घेतलेला वसा कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे म्हणाले, छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविताना दिवंगत शिवाजीराव नागवडे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वासोबत दोन वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो. साडेचार वर्षांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात सौर ऊर्जा प्रकल्प, विस्तारित इमारत आदी कामे करता आली.
यावेळी उपप्राचार्य विलासराव जाधव, ग्रंथपाल डॉ. नारायण गवळी, प्रा. सतीशचंद्र सूर्यवंशी, प्रा. सुभाष कळसकर, प्रा. एस. पी. लवांडे, प्रा. शिवाजी नेटके यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, अरुण पाचपुते, ॲड. अशोक रोडे, प्रा. सुनील माने, योगेश भोईटे, शरद खोमणे, सचिन कदम, प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, उद्योजक धनंजय भोसले आदी उपस्थित होते. प्रा. प्रवीण नागवडे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सुनील भोस यांनी आभार मानले.
---
३१ श्रीगोंदा नागवडे
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सेवापूर्ती गौरव समारंभप्रसंगी राजेंद्र नागवडे, प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, उपप्राचार्य विलासराव जाधव आणि ग्रंथपाल डॉ. नारायण गवळी व इतर.