संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:58+5:302021-06-30T04:14:58+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात रविवारी (दि. २७) प्राचार्य म. वि. कौडिण्य विद्यार्थी संशोधन प्रकल्पाचे अंतिम सादरीकरण झाले. परीक्षक ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात रविवारी (दि. २७) प्राचार्य म. वि. कौडिण्य विद्यार्थी संशोधन प्रकल्पाचे अंतिम सादरीकरण झाले. परीक्षक म्हणून विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी परीक्षण केले. कोरोनामुळे एलएमएस आणि ऑनलाईन शिक्षणाचे धोरण संगमनेर महाविद्यालयाने स्वीकारले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थतीत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, याची दक्षता महाविद्यालयाने घेऊन दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक कलागुणांना वाव मिळावा, संशोधनाविषयी गोडी निर्माण व्हावी, त्यांना संशोधनाची शिस्त लागावी, भविष्यकाळात विद्यार्थी संशोधनाकडे वळावे यासाठी महाविद्यालयात प्राचार्य म. वि. कौडिण्य यांच्या नावाने अनेक वर्षांपासून विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर, प्रा. सागर श्रीमंदिलकर, प्रा. डॉ. वाल्मीक मेंढकर यांनी विशेष परिश्रम घेतले. समन्वयकांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करून यावर्षीची स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. असेही प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सांगितले.